पायथ्यातून भव्य सुधागड दृश्यदूर खोलवर दिसणाऱ्या कोंडगाव धरणापलीकडे पेडली गाव दिवेलागणीच्या वेळेला हळूहळू उजळू लागले होते.डावीकडे दूरवर दिसणारा धूसर सरसगडाचा माथा बऱ्याच आठवणींना उजाळा देत होता.पश्चिमेला क्षितिजावर सूर्यास्ताचे लाल रंग पसरायला सुरुवात झाली अन वाघजाई घाटाच्या माथ्यावर बराच वेळ अंतर्धान पावलेली आमची चौकडी सूर्यनारायणाला पाठ दाखवत तैलबैला गावाकडे निघाली.
सह्याद्री माथ्यावर निवांत सांजवेळी घोडेजिन घाट तर ठीक आहे पण भोरप्या कुठं आहे? काही खाणाखुणा सांगितल्यावर भोरप्याला स्थानिक लोक वाघुरधव किंवा वाघाची नाळ म्हणतात अन भोरप्या हे नाव कवचितच वापरात आहे असं कळलं. वाघुरधव का तर घाटाच्या पायथ्याला पाण्याचे डोह असून वाघ तिथं पाणी प्यायला यायचे किंवा या नाळेत वाघांचा वावर असायचा म्हणून वाघाची नाळ असो.असंही आमच्या चौकडीतील तीन वाघ उद्या या नाळेत वावरणार होतो.
सूर्यास्त पाहण्यासाठी वाघजाई घाटमाथ्याकडे वाटचाल
चुलीवरचे गरम गरम जेवण
तैलबैलाच्या सानिध्यात निवांत क्षण दिवस २:१३ मे २०१८
कालच्या सुग्रास अन भरगच्च जेवणामुळे आपोआपच सकाळी लवकर जाग आली.मोकळ्या पठारावर आन्हिकं उरकायला जास्त कष्ट नाही पडले.रोकडे मावशींकडे नाश्ता उरकला.संदीप पाटील,आकाश सराफ,सारिका पाटील ह्या सह्यमित्रांची भेट अचानक झाली.ही मंडळी आज तैलबैला आरोहणासाठी आली होती.
घोडेजिन वाटेवरून मागे दिसणारा तैलबैला सवाष्णी पासून डावीकडे १० मिनिटे आडवे गेल्यावर घोडेजिन घाटाच्या माथ्यावर पोहोचलो.भव्य सुधागड अगदीच पुढ्यात दिसतो.उजवीकडे धोंडसे गाव,सरसगड नजरेस पडतात.धोंडसे गावातून सुधागडला जाणाऱ्या महादरवाजाच्या वाटेचे सुंदर दर्शन घोडेजिन माथ्यावरून होते.डावीकडे केवणीच भव्य पठार अन नाणदांड घाटाची सोंड ओळखणं तस अवघड नाही.
घोडेजिन माथ्यावरून दिसणारा भव्य सुधागड
घोडेजिन वाटेवर डांगे सर,प्रसाद अन निळू भाऊ
या सुळक्यांच्या डावीकडे गणपती खिंड आहे नाळेतून लागलीच डावीकडे जंगलात शिरणाऱ्या अस्पष्ट वाटेने निघालो.पालापाचोळ्यातील अदृश्य वाटेने करकर आवाज करत नाळेच्या उजव्या बाजूला गेल्यावर साधारण वार्म-अप चढाई करत खिंड गाठली.खिंडीतून मागे घोडेजिन घाटाच्या सोंडेचे संपूर्ण दर्शन होते.डावीकडे इटुकला घनगड उंचावर दिसतो.
गणपती खिंडीतून पूर्वेकडे घनगड अन मारठाण्याचा डोंगर
गणपती खिंडीतून घोडेजिन घाटाची सोंडप्लॅन बी नुसार मळलेल्या ऐसपैस वाटेने ठाकरवाडीकडे उतरून खालच्या मोठ्या ओढ्याला गाठायचं ठरलं.अर्ध्या तासात खालच्या पठारावर पोहोचलो अन सुधागडाच्या पूर्व कातळभिंतीचे सूंदर दर्शन झाले.तिवईचा वेढा डोंगर उंचावलेला दिसतो.ठाकूरवाडीची वाट सोडून डावीकडे ओढ्यात उतरायला २० मिनिटे पुरे झाली.
सुधागडाची पूर्व कातळभिंत
सुधागडाचा कडेलोट कडा
तिवई डोंगर
भोरप्या नाळेकडे वाटचाल
पायथ्यातून भोरप्या घाट/वाघ नाळ/वाघुरधव
भोरप्या घाट/वाघ नाळ/वाघुरधव सुरुवात
भोरप्या घाट माथा जंगलटप्पा सुरुवात
पुढच्या टप्प्यात झाडांचा ठणठणाट.तीव्र चढाई अन आग
ओकणारा सूर्य त्यामुळे एकाच दमात धापा
टाकत उंचावर दिसणार झाड गाठल.बाकीचे
मंडळ येईपर्यंत १० मिनिटे मस्त
आराम केला.इथून झक्क
जंगलाची वाट सुरु होते.नाळेची वाट सोडून उजवी
घेत जंगलात शिरलो.किर्रर्र जंगलातील १० मिनिटांची चढाई
भोरप्या नाळेच्या उजव्या खांद्यावर घेऊन जाते.डावीकडे
तैलबैलाचे सुंदर दर्शन होते.वेळ:दुपारी:१.१५
भोरप्या घाट माथ्यावरून तैलबैला दृश्य
निळू,प्रसाद,डांगे सर अन दशरथ मामा
भोरप्या नाळ पाठीमागे ठेवत
पूर्वेला जंगलात चढणाऱ्या वाटेने चढ चढायच्या आत
संपला आणि पठारावर प्रवेश
झाला.बरीचशी करवंद पोटात ढकलली.उत्तरेला जाणाऱ्या बैलगाडी रस्त्याने अर्धा तासात तैलबैला गाठलं तेव्हा तैलबैला किल्ल्याची प्रदिक्षणा पूर्ण झाली होती.
भोरप्या घाट माथ्यावरून तैलबैला दृश्य
निळू,प्रसाद,डांगे सर अन दशरथ मामाया डोंगरयात्रेचा संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लीक करा
महत्वाच्या नोंदी:
सुरवात:तैलबैला शेवट:तैलबैला
मार्ग: तैलबैला-घोडेजिन घाट-गणपती खिंड-भोरप्या घाट-तैलबैला
श्रेणी:मध्यम
एकूण डोंगरयात्रा: ९.३ किमी
वेळ:७.३० तास
चढाई उतराईतील टप्पे:
तैलबैला(६६० मीटर्स)-घोडेजिन माथा-(५९५ मीटर्स)-गणपती खिंड(३८० मीटर्स)-ठाकूरवाडी पायथा (११५ मीटर्स)-भोरप्या घाट पायथा-(२२० मीटर्स)-भोरप्या घाट माथा-(६४०मीटर्स)
प्रसन्न वाघ
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर
Aparichit ghatwatanchi mast mahiti
ReplyDeleteखुपच छान ;
ReplyDeleteमुद्देसुद व सुंदर माहितीपर वर्णन
सुटसुटीत व चटकन समजेल असं स्पष्ट लिखाण.कुठेच बापट पसारा नाही.दोन अपरिचीत घाटवाटा ची भटकंती.मस्तच.👌👌👏
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल धन्यवाद!
DeleteIts helpful for everyone.
ReplyDeleteOpen Commodity Trading Account
thank you
DeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteI enjoyed this post thanks for sharing
ReplyDeleteThank you
DeleteKhup chhan post... amhi pan plan karu.. thank you
ReplyDelete