Friday 23 June 2017

आग्या नाळ-तवीची नाळ-सिंगापूर नाळ..रायगडाच्या घाटवाटांची उतराई चढाई

      लिंगाणा,रायलिंग पठार तवीच्या नाळेच्या माथ्यावरून 

दिवस - मे २०१७
मागच्या सलग शनिवार रविवार भटकंती करायला मिळाल्यामुळे चार्ज झालेलं भ्रमणमंडळ यावेळीच्या अनवट अशा ट्रेकसाठी रेडी होतंच.आमच्या भ्रमणमंडळामधले श्री.निराद वारके यांचा विवाह सोहळा मे रोजी असल्याने एका दिवसाची डोंगरयात्रा करायचं ठरलं.प्रसादने आग्या नाळ-सिंगापूर नाळला जायचा बेत केला.रविंद्र खोबरे(टॅंगो)याच्या ट्रॅव्हलरला शेखर (आण्णा) यांना चालक बनवून भ्रमणमंडळ मोहरीच्या दिशेने रात्री ला निघाले.नसरापूरला थोडी पेटपूजा करून रात्री १२ ला मोहरीत प्रवेश केला.मोहरीचे सरपंच श्री.शिवाजी पोटे यांना भेटून घरून आणलेले डबे उघडून जेवण उरकली अन मोकळ्या जागेत पथाऱ्या पसरून आडवे झालो.वेळ:रात्री
                धुक्यात हरवलेलं मोहरी गाव 

दिवस - मे २०१७
सकाळी थोडं आळसातच डोळा उघडला बघतो तर सर्व मोहरीचं पठार धुक्याची गर्द चादर हळूहळू बाजूला करत जाग होत होतं.भ्रमणमंडळ नाश्त्याच्या तयारीला लागले होते.आन्हिकं उरकून चहा/नाश्ता उरकला.आजचे आमचे वाटाडे कचरे मामा बरोबर ला तयार होऊन आले.शेखर आण्णाला परतीच्या प्रवासातही  चालकाची भूमिका चोख पार पडायची असल्यामुळे मोहरीतच त्यांना सोडून आम्ही एकलगाव कडे चालू लागलो.तस आग्या नाळेची वाट एकलगावातूनच सुरु होते पण आम्हाला मोहरीतला मुक्काम सोडायचा नव्हता अन परतीचा मार्ग मोहरीतच येतो त्यामुळे आम्ही ही डोंगरयात्रा मोहरीतून सुरु केली.वेळ सकाळी:.३०
                                 नाश्त्याची तयारी 

सकाळच्या धुकभरल्या वातावरणात २० मिनिटांनी गाडीरस्ता सोडत डोंगराला डावीकडे वळसा घालणाऱ्या वाटेने (हा जवळचा मार्ग आहे)एकलगावात एन्ट्री मारली.वेळ सकाळी:.२५ गावातल्या लोकांना रामराम करत गावात असलेल्या छानश्या अशा शाळेजवळून पश्चिमेला जाणाऱ्या वाटेने उतराई सुरु केली.वाट बऱ्यापैकी मळलेली आहे त्यामुळे चुकण्याची शक्यता नाही.१० मिनिटे खाली उतरल्यावर एक छोटासा ओढा पार केला.दरी डाव्या बाजूला ठेवत बारीक पायवाट उजवीकडे वळण घेत पुढच्या २० मिनिटांत नाळेत पोहोचवते. वेळ सकाळी:. १०
            एकलगावातून आग्या नाळेकडे उतराई

इथून पुढची वाट हि बऱ्यापैकी इतर नळीच्या वाटांसारखी आहे फरक फक्त एवढाच आग्या नाळेतील दगड भक्कम असून घसारा अजिबात नाही त्यामुळे निवांत टुणूक टुणूक करत साधारण ४५ मिनिटांत खालच्या सपाटीवर पोहोचलो.नाळेनंतर वाट उजवीकडे वळून अधून मधून भुरट्या जंगलात शिरून एका मोठा ओढ्यात नेऊन सोडते.अधून मधून समोर दुर्गदुर्गेश्वर रायगडाचे दर्शन सुखावून जाते.कधी ओढ्यातून कधी ओढ्याच्या कडेने मार्गक्रमण करत पाणवठ्याजवळ पोहोचलो.चक्क मे महिन्यात एवढा पाण्याचा शुद्ध साठा पाहून भ्रमणमंडळ खुश.शेजारीच असलेल्या गर्द झाडाखाली बसून प्रत्येकाने पोतडीतून चाऊ माऊ खाऊ काढला.नेहमीप्रमाणे योगिता अन प्रसादने विविध प्रकारचे फूड आयटम काढून सर्वानाच खुश केले.वेळ:१०.४०
                          आग्यानाळ उतराई  
                 भव्य आग्यानाळ पायथ्यातून 

ठरल्याप्रमाणे पोटोबा झाल्यानंतर ठरलेली योजना कचरे मामांनी ताटात वाढली.इथून पुढे अशाच ओढ्याच्या वाटेने दापोली गाठायला साधारण तास लागतील अन परत सिंगापूर नाळ हि तुलनेने सोपी पण लांबची असल्यामुळे बराच वेळ घेईल त्यापेक्षा तवीच्या नाळेने वर चढून रायलिंग पठारावर सिंगापूर नाळेला गाठू.तवीची नाळ तशी डोंगरयात्रींमध्ये सुद्धा कमी परिचयाची.अनवट अशा तवीची नाळ करायला भेटणार म्हणल्यावर लागलीच मुबलक पाणी भरून भ्रमणमंडळ टेकऑफ ला तयार झाले.वेळ सकाळी:११
    दापोलीकडे जाताना उजवीकडे दिसणारी तवीची नाळ 

ओढ्यातूनच १० मिनिटे दापोलीकडे उतरल्यावर उजवीकडे एक त्रिकोणी डोंगरसूळका अन त्याच्या उजव्या बाजूला खिंड दिसते हीच आहे तवीची नाळ. या नाळेतून येणार छोटासा ओहोळ जिथे मुख्य ओढ्याला मिळतो तिथूनच उजवीकडे वळून तवीच्या नाळेला भिडलो.बरोबर मागे फणशीच्या नाळेचे सुंदर दृश्य दिसते.
             तवीची नाळ सुरुवात
    तवीच्या नाळेतून फणशीची नाळ(जननी नाळ अन फडताड नाळ पलीकडे उतरते) 

रखरखत्या उन्हात आज प्रत्येकाचा कस लागणार याची जाणीव पहिल्या टप्प्यावरच आली.विसाव्यासाठी शोधून झाड सापडेना अन वाट चढाची असल्यामुळे थोडीफार दमछाक व्हायला सुरुवात झाली होती.बऱ्यापैकी अडचणीतून सोपे कातळटप्पे पार करत एका अरुंद अशा वाटेवर एका भल्या मोठा दगडाने आमची वाट आडवली.दगडाच्या डाव्या बाजूने सोपी चिमणी चढाई करून वर पोहोचलो.कचरे मामांनी उजवीकडून छोट्याश्या बिळातून वर येण्याचा मार्ग दाखवला.सर्वानी स्वतःला वर खेचत हा टप्पा पार केला.अजून बरेच टप्पे चढूनही माथा काही दिसेना शेवटी तासभर चढाई झाल्यावर शरीरं तापली अन एक झाड बघून विसाव्यासाठी मंडळ विसावलं.वेळ दुपारी:.३०
                                    छोटा कातळटप्पा 

आजच्या भ्रमणमंडळातील एकमेव वाघीणीला (योगिता)थोडा उन्हाचा जास्त चटका बसल्याने सफरचंद अन पाण्याचा मारा करून तिला फ्रेश करण्यात आले.प्रजेश भाऊ उन्हाला चांगलेच त्रासून आहे त्या जागीच आडवे झाले.चांगला १५ मिनिटे आराम केल्यावर शरीराचं तापमान शांत झाले.खालून पाहिलेली खिंड अजूनही नजरेच्या टप्प्यात आली नव्हती.
निळू भाऊ (निलेश वाघ),टॅंगो अन विनायक(सोनमळे)यांनी आघाडी घेत चढाई सुरु केली.इथून पुढचा टप्पा अजून तीव्र चढाईचा निघाला.पावलांनी आता ताल धरल्यामुळे अन कुठेही सावली नसल्यामुळे करपण्याच्या आधी धापा टाकत शेवटचा घसाऱ्याचा टप्पा पार करून एका तासात खिंडीत पोहोचलो.गेल्या तासात मिळालेली वाऱ्याची झुळूक अंगावर आल्यावर नवीन ऊर्जा मिळाली.वेळ दुपारी:.१५
    तवीच्या नाळेच्या माथ्यावरून दुर्गदुर्गेश्वर रायगड,लिंगाणा 

खिंडीतून साधारण वायव्येला लिंगाणा अन दुर्गदुर्गेश्वर रायगडाचे वेगळेच रूप पाहायला मिळाले.उत्तरेला समोर रायलिंगची दक्षिण बाजू दिसते पण समोर जाणारी वाट काही दिसेना.मोरे मामांनी वाट आहे म्हणल्यावर त्याच्या मागे जाऊन पहिले तर जेमतेम पाऊल बसेल एवढी वाट कशीतरी कड्यावर उकरली होती.डावीकडची भीषण दरी अन घसाऱ्याची बारीक वाट काळजी घ्यावीच लागेल असं सांगत होती.कचरे मामा अन टॅंगोने मांझी मॅन बनून वाट थोडीशी साफ केली.त्यांच्यामागून जाऊन मी अन प्रसादने रस्त्याचा आढावा घेतला अन बाकीच्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आला.आता वाट उजवीकडे जंगलात शिरते.किर्रर्र अशा जंगलात वाट अशी नाहीच.कचरे मामा कुशलतेने एक एक वळण अचूकतेने हेरत होते अन त्याच्यामागे आम्ही मार्गक्रमण करत होतो.साधारण तासभर जंगलातून चढाई करत जंगलातून बाहेर पडलो तेव्हा आम्ही सिंगापूर नाळेच्या वाटेला रायलिंग पठारावर गाठलं होत.वेळ दुपारी:.१५
    सिंगापूर नाळेच्या वाटेवरून तवीच्या नाळेची खिंड 

मागे वळून पाहिलं तर तवीच्या नाळेची खिंड आता सुखावह वाटत होती.खाली समोर दापोली गाव निपचित वाटत होत.वाळणकोंड मंदिर दुरूनही ओळख दाखवत होत.पश्चिमेला दुर्गदुर्गेश्वर रायगड बघून आपोआप हात जोडले गेले.बाजूला उजव्या खांद्याजवळ लिंगाण्याचा अभेद्य सुळका बऱ्याचदा त्याच्यावर केलेल्या थरारक चढाईच्या आठवणी ताज्या करून गेला.डोहाच्या पात्रात पाणी होत.लागलीच नेहमीप्रमाणे योगिता अन निळू भाऊंनी खाऊ बनवला.बकाबका खाऊन पाणी भरून घेतले.वेळ दुपारी :
पुढची वाट हि  सिंगापूर नाळेची वाट असल्यामुळे पूर्णपणे मळलेली अन सोपी आहे.४५ मिनिटांनी उजवीकडे जाणारी सिंगापूर गावाची वाट सोडून समोर मोहरीकडे चढणारी वाट धरली.१५ मिनिटांची तीव्र चढाई करून श्री.शिवाजी पोटे साहेबांचे घर गाठले.वेळ संध्याकाळी:
  मोहरी गावातील बालसवंगड्याबरोबर भ्रमणमंडळ.डावीकडून रवी (टॅंगो),विनायक,योगिता,प्रसाद

आवरा आवर करून कचरे मामांचे आभार मानले.लवकरच भेटू असं सांगून त्यांचा निरोप घेतला.गावात चॉकलेट वाटप करून पश्चिमेकडे कलत्या सूर्यनारायणाबरोबर आम्हीही आमच्या आवडत्या मोहरीचा निरोप घेतला.परतीच्या वाटेवर वेल्हा गावाबाहेर असलेल्या विसावा हॉटेल मध्ये विसावा घेत पोटोबा करण्यात आला. रात्रीच्या च्या मुहूर्तावर पुण्यनगरीत पोहोचलो.

या पूर्ण ट्रेकचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

महत्वाच्या नोंदी :
सुरवात : मोहरी शेवट : मोहरी 
मार्ग : मोहरी -एकलगाव -आग्या नाळ -तवीची नाळ -सिंगापूर नाळ-मोहरी 
एकूण चढाई उतराई :१३८०मीटर्स
श्रेणी :मध्यम 

चढाई उतराईतील टप्पे:

मोहरी:९१५:मीटर्स--एकलगाव आग्या नाळ उतराई  सुरुवात--७८५ मीटर्स--तवीची नाळ चढाई सुरवात:२२५मीटर्स--तवीची नाळ माथा:६६० मीटर्स --मोहरी:९१५ मीटर्स =एकूण १३८०मीटर्स

नोट:आजकाल बरेच ट्रेकर मंडळी जीपीएस वापरतात .वरील दिलेली माहिती हि सह्याद्रीत ट्रेक करणाऱ्या अनुभवी ट्रेकर्स ना उपयोगी पडू शकते म्हणून देत आहे.
तवीच्या नाळेला वाटाड्या किंवा माहितगार माणूस बरोबर असणे आवश्यक. 

प्रसन्न वाघ
वाइल्ड ट्रेक ऍडव्हेंचर 

No comments:

Post a Comment