कौल्याच्या धारेवरून कोथळीगड,पदरगड,सिद्धगड अन भीमाशंकर
दिवस १ -२० मे २०१७
साधारण
महिन्याभरापूर्वी फेण्यादेवी घाटाची उतराई करताना कळकरायवाडीतून कोथळीगडाने दुरूनच दर्शन देऊन आमच्याकडेही या असं निमंत्रण
दिल होत.आम्हीही नेहमीच्या मार्गाने कोथळीगड न गाठता वाट
वाकडी करून पायरी अन कौल्याच्या धारेने
उतराई चढाई करायचं पक्कं केलं.रवी खोबरे (टॅंगो) अन शेखर (आण्णा)
यांना शिफ्ट मध्ये बसवून आम्ही माळेगावकडे कूच केलं(सावळा गावाजवळील).वेळ संध्याकाळी:४
मुक्कामाच्या ठिकाणावरून दिसणारा ढाकचा किल्ला
कलत्या
सूर्यनारायणाबरोबर माळेगावात पोहोचलो.छोटयाश्या गावात असलेल्या भव्य मंदिरासमोर गाडी पार्क करून गावातल्या मंडळींबरोबर वाटाड्या अन उद्या करायच्या
असलेल्या घाटवाटांची चर्चा सफल करण्यात आली.एक तरुण व्यक्तिमत्व
वाटाड्या म्हणून यायला तयार झालं.थोडस पाणी बरोबर घेऊन गावासमोर असलेल्या टेकडीवर जाऊन मुक्कामाची जागा ठरवण्यात आली.खरंच अतिशय रम्य अशी जागा होती.आंध्रा धरणाच्या पाणी फुगवट्यामागे ढाकचा बहिरी दर्शन देत होता.थोडस सरपण गोळा करून चूल पेटवली.पूजाने चुलीचा ताबा घेत गरम जेवण बनवले.उद्याचा पल्ला मोठा असल्याने उद्या दुपारच्या जेवणासाठी अंडी उकडून घेण्यात आली.सर्व आवरून शाका भरून ठेवल्या.काजव्यांच्या झगमगाटात बरीचशी झाडे मधूनच उजळून निघत होती.पथाऱ्या पसरल्या अन स्लीपिंग बॅगमध्ये
शिरलो.वेळ रात्री:९.४५
मुक्कामाची जागा अन सूर्यास्त
दिवस २: २१ मे २०१७
भल्या
पहाटे ५ ला उठून
आन्हिकं उरकली. मॅग्गीचा अल्पोपहार करून इतर सामान गाडीत ठेवलं.काही अपरिहार्य कारणामुळे आमचे वाटाडे यांनी अचानक नाही जमणार म्हणल्यावर दिशांची अन डोंगररांगेच्या अभ्यासाची
चाचणी घेण्यासाठी मस्त मोका मिळाला.काही खुणा लक्षात घेऊन आम्ही माळेगावच्या उत्तरेला असलेल्या छोट्याश्या टेकडीवरील मळलेल्या वाटेला लागलो.वेळ सकाळी:६.१५
एक
ओढा अन काही घरटी
गोठे पार केल्यावर एक बैलगाडी रस्ता
आडवा आला.इथून समोर जाणारी वाट सोडून उजवी घेतली.वॉर्मअप चढ चढून माथा
गाठला.इथून एक ठळक पायवाटेने उजवीकडे बैलघाट,कौल्याची धार,नाखिंदा घाट अन वांद्रे खिंडीकडे
जाता येते.यासाठी सह्याद्रीच्या धारेपासून समांतर साधारण २५-३० फूट
आतून पायवाटेने जावे.समोरच भव्य असे पायरीचे झाड दिसते म्हणून या घाटाला पायरी
घाट म्हणतात.सह्यमाथ्यावरुन खाली उजव्या हाताला कोथळीगडाचा माथा ढगांच्या गर्दीतून उंचावलेला दिसला.बाकी ढगाळ वातावरणामुळे थोडी निराशाच झाली.वेळ सकाळी:६.५०
पायरी घाटातून दिसणारा कोथळीगड
पायरी घाटाची वाट
लागलीच मोठ्या झाडापासून खाली उतरणारी ऐसपैस वाटेने उतराई सुरु केली.वाट अजूनही वापरात असल्यामुळे चुकण्याची शक्यता नाही अन कुठेही अवघड नाही.जंगलातून ३०-३५ मिनिटांत खालच्या पठारावर आलो अन बऱ्याच वेळानंतर सूर्यदर्शन झाले.पठारावरून डावीकडची वाट कळकरायवाडीत घेऊन जाते.(१ तास)
लागलीच मोठ्या झाडापासून खाली उतरणारी ऐसपैस वाटेने उतराई सुरु केली.वाट अजूनही वापरात असल्यामुळे चुकण्याची शक्यता नाही अन कुठेही अवघड नाही.जंगलातून ३०-३५ मिनिटांत खालच्या पठारावर आलो अन बऱ्याच वेळानंतर सूर्यदर्शन झाले.पठारावरून डावीकडची वाट कळकरायवाडीत घेऊन जाते.(१ तास)
कोथळीगडाकडे वाटचाल
उजवीकडे
जाणाऱ्या पायवाटेने ५ मिनिटांत एक
सुंदर अशी प्राचीन बारव (चौकोनी विहीर) नजरेस पडते.पाणी अतिशय खराब
असून पिण्यालायक नव्हते.पुढे २ वाटा फुटतात.उजवीकडची वाट हि बैलघाटाकडे जाते
अन डावीकडे पेठ गावाकडे.आम्ही उजवी घेऊन बैलघाटाच्या सुरुवातीला जाऊन
आलो.घाटाच्या सुरुवातीच्या आधीच डावीकडे वाट दाट जंगलात शिरली.पुढे भैरोबा देवस्थान गर्द जंगलात वसलेलं आहे.इथून आम्हाला परत पेठ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागायचे होते.एक अस्पष्ट अशी
पाऊलवाट शोधत डावीकडे (उत्तरेला)५ मिनिटं उतरत
मगाशी सोडलेल्या वाटेला येऊन मिळालो.वेळ सकाळी:८.१५
प्राचीन बारव
भैरोबा देवस्थान
समोर कोथळीगडाचा माथा आता जवळ भासू लागतो.समोरच उंचावर पदारवाडीतील पवनचक्क्या अन परतीचा कौल्याच्या धारेचा मार्ग आता सोबती होता.खालच्या पठारावरून कोथळीगडाचा माथा समोर ठेऊन पदरातून सोपी अशी तासाभराची वाटचाल करत किल्ल्याच्या पदरात पोहोचलो.मागे दूरवर पायरी घाट,फेण्यादेवी घाटाचा डोंगर अन जंगल टप्पा अप्रतिम दिसतात.थोडासा चाऊ माऊ खाऊ खाऊन क्षणभर विश्रांती घेतली.
क्षणभर विश्रांती.. समोर पायरी घाटाची वाट
कोथळीगडाजवळ पोहोचताना
कोथळीगडाच्या
उजव्या बाजूला दिसणारी खिंड समोर ठेऊन एक छोटासा चढाई
टप्पा पार करत खिंडीत पोहोचलो.इथून पुढे सरळ पेठ गाव उजवीकडे कौल्याची धार अन डावीकडे कोथळीगडाकडे
जाणारी वाट आहे(ही किल्ल्यावर जाणारी
वाट किंचित अवघड श्रेणीची असून बराच घसारा आहे त्यामुळे गावातील सोप्या वाटेने कोथळीगड गाठावा १ तास).
खिंडीतून डावीकडे कोथळीगडाला जाणारी थोडी अवघड वाट
आम्ही
चौघेच असल्याने आम्ही डावीकडची गडावर जाण्याची वाट धरली.छोटासा चढाई टप्पा चढल्यावर सुंदर असं दृश्य उघड झालं.साधारण ईशान्येला पदरगड (कलावंतीण महाल)उठावदार दिसतो.पदरगडाच्या डावीकडे सिद्धगडाचा बालेकिल्ला त्याच्या उंचीमुळे अन त्रिकोणी आकारामुळे
सहज ओळखू येतो.पदरगडाच्या उजव्या बाजूला भव्य अन या रांगेतील
सर्वात उंच असं भीमाशंकर,पूर्वेला खेतोबा मंदिर,वाजंत्री घाट,शिडी घाट नजरेस पडतात.आग्नेयेला नाखिंदा अन कौल्याची धार
अन पदारवाडीतील पवनचक्क्या,मागे दक्षिणेला उतरून आलेलो पायरी घाटाची खिंड अन बैल घाट
असा डोळे तृप्त करणारा परिसर दिसतो.उन्हाच्या वाढत्या चटक्याने पाय काढता घ्यावा लागला नाहीतर इथून हालायचीही इच्छा होऊ नये असंच ते दृश्य होत.
पुढचा घसाऱ्याचा टप्पा अन पाय बसेल
एवढ्याच वाटेने कसेबसे गवत काड्या पकडत बरोबर कोथळीगड सुळक्याच्या दक्षिणेला चढलो.अर्धवर्तुळाकार प्रदक्षिणा करत नेहमीच्या वाटेला लागलो.वेळ: सकाळी ११
१५
मिनिटांत एका गुहेत पोहोचून क्षणभर विश्रांती झाली.समोर कौल्याची धार उन्हात रखरखीत वाटत होती.सुळक्याला वळसा घालत मुख्य गुहेजवळ पोहोचलो.भव्य अशी गुहा बघून थक्क व्हायला होत.त्याहीपेक्षा कोथळीगडाच्या माथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या बघून हे बुवा कस
केलं असेल असा विचार करत सुंदर अशा दरवाज्यातून सर्वोच्य ठिकाणी पोहोचलो.भन्नाट वारा अनुभवून लागलीच खालची गुहा गाठली.मस्तपैकी दुपारचे भोजन उरकण्यात आले.थंडगार पाणी पिऊन पुढच्या भटकंतीसाठी मंडळ तयार. वेळ दुपारी:१२.१५
कौल्याची धार
कौल्याच्या धारेवरून पायरी घाट
धोपट मार्गाने पेठ गावात उतरून गावाच्या दक्षिणेकडे असलेल्या खिंडीकडे निघालो.१५ मिनिटात खिंड गाठून थोडा वेळ विश्रांती घेण्यात आली.कौल्याच्या धारेची सोंड या खिंडीपर्यंत उतरल्यामुळे वाट शोधणं अवघड नाही. खिंडीतून डावीकडे एक छोटासा वळसा घेत मुख्य सोंडेवर आरूढ झालो.पधारवाडीतील पवनचक्क्या उंचावर लक्षवेधक आहेत.टळटळीत उन्हाचा दाह भन्नाट वाऱ्यामुळे जाणवत नव्हता.उजवीकडे सकाळी उतरलेली पायरी घाटाची वाट दिसत राहते.पूर्ण वाट धारेवर असल्याने दोन्ही बाजूला दरी असून मधून मस्तपैकी पाऊलवाट आहे.२५ मिनिटांची तीव्र चढाई करून एका सोप्या कातळटप्प्याजवळ पोहोचलो.मागे कोथळीगड,पदरगड,भीमाशंकर अन सिद्धगडाच्या अप्रतिम दर्शनाने सुखावून गेलो.माथा गाठून विजयी मुद्रेत फोटोसेशन करण्यात आले.वेळ दुपारी:२.३०
धोपट मार्गाने पेठ गावात उतरून गावाच्या दक्षिणेकडे असलेल्या खिंडीकडे निघालो.१५ मिनिटात खिंड गाठून थोडा वेळ विश्रांती घेण्यात आली.कौल्याच्या धारेची सोंड या खिंडीपर्यंत उतरल्यामुळे वाट शोधणं अवघड नाही. खिंडीतून डावीकडे एक छोटासा वळसा घेत मुख्य सोंडेवर आरूढ झालो.पधारवाडीतील पवनचक्क्या उंचावर लक्षवेधक आहेत.टळटळीत उन्हाचा दाह भन्नाट वाऱ्यामुळे जाणवत नव्हता.उजवीकडे सकाळी उतरलेली पायरी घाटाची वाट दिसत राहते.पूर्ण वाट धारेवर असल्याने दोन्ही बाजूला दरी असून मधून मस्तपैकी पाऊलवाट आहे.२५ मिनिटांची तीव्र चढाई करून एका सोप्या कातळटप्प्याजवळ पोहोचलो.मागे कोथळीगड,पदरगड,भीमाशंकर अन सिद्धगडाच्या अप्रतिम दर्शनाने सुखावून गेलो.माथा गाठून विजयी मुद्रेत फोटोसेशन करण्यात आले.वेळ दुपारी:२.३०
पदरगड,भीमाशंकर अन सिद्धगड अप्रतिम दर्शन
भ्रमणमंडळ..शेखर आण्णा,रवी खोबरे (टॅंगो) अन पूजा
इथून डावीकडे पवनचक्क्या उजवीकडे ठेवत पदरातून भीमाशंकर गाठता येते.(५ ते ६ तास).ही वाट वांद्रे खिंडीतून आलेल्या वाटेल साधारण तासाभरात गाठते.
इथून डावीकडे पवनचक्क्या उजवीकडे ठेवत पदरातून भीमाशंकर गाठता येते.(५ ते ६ तास).ही वाट वांद्रे खिंडीतून आलेल्या वाटेल साधारण तासाभरात गाठते.
कौल्याची धार माथ्यावरून कोथळीगडाचा माथा
आम्ही उजवीकडे तळपेवाडीकडे जाणाऱ्या वाटेने निघालो.इथून बऱ्याच ढोरवाटा वाट चुकवू पाहत होत्या आम्ही मात्र सह्याद्रीच्या धारेला समांतर आत ३०-४० फुटावर असणाऱ्या पायवाटेने मार्गक्रमण करत होतो.साधारण तासाभरात एक वाट उजवीकडे खाली उतरते हि बैलघाटाची वाट असावी.
समोर जाणारी वाट ही सकाळी केलेल्या पायरी घाटाकडे जाते.या वाटेने माळेगाव गाठावं कि तळपेवाडी यावर शुल्लक चर्चा झाली.जिपीएसमध्ये माळेगाव बरंच दूर दिसल्याने डावीकडे उतरणारा रस्त्याने तळपेवाडीकडे निघालो. ५ -१० मिनिटांच्या उतराई नंतर एक मोठा ओढा आडवा आला.पावसाळ्यात हा ओढा पार करण्यासाठी दोरी अन अनुभव आवश्यक.ओढा पार करून सपाटीला पोहोचलो अन तळपेवाडीकडे जाणारा बैलगाडी रस्ता लागला.मागे वळून पाहिलं तर पधारवाडीतील पवनचक्क्या दूर पडल्या होत्या.थोडीशी करवंद पोटात ढकलून बैलगाडी रस्त्यावरून बैलासारखे हालत डुलत तळपेवाडीत पोहोचुन सकाळी ६ पासून सुरु केलेली १० तासांची डोंगरयात्रा सफल करण्यात आली. वेळ संध्याकाळी:५
शेखर अण्णांना एका दुचाकीवर बसवून माळेगावमधून गाडी आणण्यास पाठवण्यात आले. १५-२० मिनिटात परतीच्या मार्गाला लागलो.वाटेवर लागलेल्या धरणाच्या पाण्यात अंघोळ उरकून ६.३० ला गृहप्रवेश केला.
डोंगरयात्रेचा नकाशा
या ट्रेकचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
महत्वाच्या नोंदी :
सुरवात : माळेगाव शेवट: तळपेवाडी
मार्ग : माळेगाव-पायरी घाट-कोथळीगड-कौल्याची धार-तळपेवाडी
एकूण चढाई उतराई :९०१मीटर्स
एकूण अंतर:२२ किमी
श्रेणी :मध्यम
चढाई उतराईतील टप्पे:
माळेगाव-६३६ मीटर्स--पायरी घाट सुरुवात-६६५ मीटर्स--खालील पठार-३७३ मीटर्स-कोथळीगड खिंड-४०६ मीटर्स-कोथळीगड माथा-६३५ मीटर्स
कौल्याची धार माथा-७०९ मीटर्स--तळपेवाडी-६६८ मीटर्स (सर्वोच्च पॉईंट:७४७ मीटर्स)
नोट:आजकाल बरेच ट्रेकर मंडळी जीपीएस वापरतात .वरील दिलेली माहिती हि सह्याद्रीत ट्रेक करणाऱ्या अनुभवी ट्रेकर्स ना उपयोगी पडू शकते म्हणून देत आहे.
प्रसन्न वाघ
No comments:
Post a Comment